बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

नमस्कार

हा माझा "ब्लॉग" लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. काही चुका झाल्यास समजून घ्यावे ही विनंती.......

बरेचदा मला भेटणाऱ्या अनेक जणांचे निर्रीक्षण करताना मला पडलेले प्रश्न म्हणजे .......
हा माणूस चिडचिड का करतो?
अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर माणसाला राग का येतो...?
का समोरचा माणूस काय म्हणतो आहे हे आपण ऐकून , समजावून घेण्याच्या आधीच त्या बाबतीत आपले मत पक्के करतो?
समोरच्या पेक्षा आपण काहीतरी भारी आहोत किंवा त्या व्यक्तीपेक्षा आपल्याला जास्त कळते हे दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी....?
हे आणि असे अनेक प्रश्न मला नंतर भंडावून सोडतात....पण अनेक वेळा प्रयत्न करूनही या प्रश्नांची मला उत्तरे सापडत नाहीत.
कोणावरही चिडून, ओरडून व रागावून काहीच साध्य होत नाही....पण नाही म्हणायला कधीतरी याचा पण फायदा होतो हे मात्र मान्य करावे लागेल. आपल्याला आपल्या भावनांचा एक हत्त्यार अथवा tool म्हणून वापर करणे हेच या स्पर्धेच्या जगात कामाला येवू शकते. योग्य वेळी योग्य त्या भावनेचा वापर करता येणे हे आजच्या काळाची गरज बनली आहे आणि म्हणूनच आजकाल aptitude test बरोबरच अनेक कंपन्या उमेदवाराचा "IQ , EQ, आणि PQ " सुद्धा तपासला जात आहे....
हे फक्त भावना योग्य ठिकाणी व्यक्त करणे एव्हड्या पुरते मर्यादित नसून मनात साठून राहिलेल्या भावनांचा योग्य वेळी आणि योग्य त्या प्रकारे निचरा होणेसुद्धा महत्वाचे आहे. असे न घडल्यास अनेक गोष्टी मनात साठत जातात आणि त्या मुळे येणारा तणाव वाढत जातो. हाच तन सहन न झाल्याने अत्माहात्यांसारखे विचार मनात येवू शकतात.
या व अशा अनेक गोष्टीवर आपल्या भोवतालचे जग "slow down" करणे हा एक उपाय असू शकतो... म्हणजे सुरुवात स्वतापासून करायची... बोलताना, चालताना अथवा कोणतीही कृती करताना सगळ्या गोष्टी सावकाश करायच्या.... शब्दांवरचे आघात, आपला स्वर, आपला बोलण्याचा व चालण्याचा वेग हे सगळे कमी करायचे.... अगदी कोणाला तरी शिव्या देण्याचा प्रसंग आलाच तरी "देणाऱ्या पेक्षा घेणाऱ्याला आनंद व्हायला पाहिजे....." एकदा हे जमले की मग पुढे होणाऱ्या गोष्टीवर जास्त चांगल्या पद्धतीने सारासार विचार करता येतो.....
आणि शेवटी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हे माहित असूनही सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात याव्या यासाठी प्रयत्न करत राहणे हे नक्कीच आपल्या हातात आहे......

--
चेतन कुलकर्णी

५ टिप्पण्या:

परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...