बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

नजर



नजर

रात्रीचे ११.३० वाजले होते, सहसा या वेळेला बायको सोडून दुसरे कोणी माझी वाट बघत नाही पण आजचा दिवस वेगळा होता. माझे १०-१२ मित्र माझ्या घरी ठाण मांडून बसले होते. आज कितीही उशीर झाला तरी मी घरी जावून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्याशिवाय माझी सुटका नव्हती. जरी माझ्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे असली तरी ती त्यांना किती पटतील आणि खरी वाटतील याचा भरवसा नव्हता. गाडी चालवता चालवता मागील महिन्यात घडलेल्या सगळ्या घटना आठवत होत्या.
आपण mobile वर कितीही २४ तास online वगेरे असलो तरी रात्री - वाजता झोपमोड करणारा फोने आला की मनातून भीती ही वाटतेच. फोन उन्मेषचा होता पण वाहिनी बोलत होत्या, उन्मेष चा अपघात झाला होता आणि admit केले होते. फोन ठेवला आणि तडक निघलो. मी पोहोचेपर्यंत अजून - मित्र आले होते. उन्मेष बेशुद्ध होता. डोके आपटले होते पण helmet असल्याने फार काही झाले नव्हते, फक्त ठिकठिकाणी खरचटले होते. सगळे मित्र जमले होते. काय झाले कसे झाले या सगळ्यात दुसरा दिवस उजाडला पण उन्मेष अजून बेशुद्धच होता. पुढचे दिवस उन्मेष बेशुद्धच होता आणि आमची काळजी क्षणाक्षणाला वाढत होती. उन्मेष शुद्धीवर आला पण त्याला काहीच दिसत नव्हते. त्याची दृष्टी गेली होती.
हा उन्मेष म्हणजे साधा सरळ व्यक्ती. बोलायला रोकठोक पण गोडना कोणते व्यसन ना काही. त्याचे सगळे कसे एका चौकटीत बांधलेले आणि जागच्याजागी. त्याला देवघरातल्या उदबत्तीच्या घराची जागासुद्धा बदललेली चालायची नाही. या चौकटीच्या बाहेर काही करायला त्याचा विरोध असायचा पण स्वतःपुरता.व्यवसायानी इंजिनिअर पण स्वभावानी पक्का हिशोबनीस. प्रत्येक गोष्टीत हिशोब आणि गणित. एरवी काही विशेष वाटायचे नाही पण एखाद्या सहलीला गेल्यावर मात्र त्याचा त्रास व्हायचा. त्याला, आम्हाला आणि त्याच्या कुटुंबाला. आम्ही त्याला समजावून थकलो होतो आयुष्यात फक्त गणित नाही पण इतर गोष्टीही असतात कधीतरी सगळे हिशोब, गणिते, ताण-तणाव सगळे काही विसरून हा क्षण अनुभवायचा असतो, त्याचा आनंद घ्यायचा असतो. पण साल्याचे  नाव आणि स्वभाव काही केल्या जुळत नव्हते. घरात हिशोबाचा आणि फक्त उपयोगाचा विचार करून आलेल्या गोष्टी आणि वस्तू. घराला रंग देताना पण तोच विचार आणि शेवटी फिकट निळा रंगतोच वर्षानुवर्षेबर असते एखायाची निवड पण प्रत्यक गोषित चुका काढायची आणि त्या दुरुस्त करायची पण सवय

हा असा उन्मेष आमच्या उनाड पोरांच्यामध्ये कसा काय आला आणि कधी आमच्यातला झाला कळलेच नाही आणि म्हणूनच आज दोन महिने त्याच्यासाठी आम्ही सगळे नेत्रपेढीच्या चकरा मारतोय, त्याच्यासाठी जे काय म्हणून करता येईल ते सगळे करतोय. प्रयत्न, प्रार्थना, वेगवेगळे डॉक्टर जे जे काय सुचेल ते सगळेत्याच्या घरच्यांशी मी रोज बोलतो पण अजून त्याच्या समोर जाण्याची हिंमत काही झाली नाही माझी. मी नाहीच बघू शकत त्याला असासगळ्यांना धीर देताना कारण मला माहित आहे वरून कितीही अभेद्य बुरुज वाटणारा उन्मेष मात्र काळजीत आहे त्या दिखाऊ बुरुजाच्या खचणाऱ्या पायाबद्दल
कामासाठी भारताबाहेर असताना मित्राचा फोन आला "आपल्या प्रार्थनांना, प्रयत्नांना यश आले, नेत्रदाता मिळाला. आजच operation करणार आहेत." त्या दिवशी कळले, प्रयत्नांना यश आले की डोळे आपोआप भरून येतात. सगळे व्यवस्थित झाले, उन्मेष ला सगळे पाहिल्याप्रमाणे दिसू लागले. एव्हाना इतर जखमापण भरून आल्या होत्या. पणउन्मेषच्या वागण्यात प्रचंड फरक पडला होता. त्याच्या वागण्यातील बदलाचे किस्से मला ऐकायला मिळत होते. मला लवकर घरी जाण्याची घाई झाली होती पण काम दिवसेंदिवस वाढत होते आणि माझ्या मुक्कामाचे दिवससुद्धाउन्मेषशी बोलावे असे वाटत होते पण अजूनही हिम्मत होत नव्हती. त्याची नजर गेल्यापासून त्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणवणारा मी त्याला एकदाही भेटलो नव्हतो. त्यांनी सगळ्यांना स्वतः फोन केला होता फक्त मला मात्र केला नव्हता. एकदाचे काम संपले आणि मी परत घरी आलो.
एक-दोन दिवसात सगळे मित्र भेटले आणि उन्मेष कसा बदलला आहे याचे नवनवीन किस्से मला समजले. उन्मेषला परत दिसायला लागून आता महिने झाले होते. उन्मेषमधील या बदलाचे कारण मात्र कोणालाच काळात नव्हते. सगळ्यांनी विचारून पहिले पण काही उपयोग होत नव्हता. घरी वहिनींना पण याचे कारण काळात नव्हते पण सगळेच या बदलाने खुश होते. निघताना अतुल म्हणाला "सगळ्यांना त्याने एकच उत्तर दिले आहे की याचे कारण समजावून घेणारा एकच व्यक्ती आहे." मी मनातून सुखावलो पण एरव्ही रोकठोक बोलणारा उन्मेष असे सगळ्यांना उडवून लावणारा नाही हे मला माहित होते आणि मग मी या बदलाचे कारण समजावून घेण्यासाठी उन्मेषला भेटायचे ठरवले. सगळ्यांना कारण समजावून घ्याचेच होते म्हणून सगळे माझ्या घरी जमणार हे पण ठरले . तोच आजचा दिवस
अचानक जायचे असे ठरवून मी उन्मेषच्या घरी पोहोचलो. आता मला धक्के बसणार याची मला कल्पना होती पण त्यांच्या तीव्रतेचा मला अंदाज नव्हता. चौथ्या मजल्यावर आलो पण मला त्याचे घरच ओळखू येईना. दाराला रंग वेगळा, दारावर झक्कास पाटी, आजूबाजूचा सजवलेला परिसरमी बेल वाजवलीपण नेहमीची टिंग-टोंग बेल बदललेली होती, छान सुरेल संगीताची बेलउन्मेषच्या घरी आल्यावर इतके प्रसन्न पहिल्यांदाच वाटत होते. मी मनात ठरवले आता जे काही असेल, दिसेल त्याबद्दल कोणताही पूर्वग्रह ठेवायचा नाही. जे येईल ते स्वीकारायचेदर उघडलेसंपूर्ण घरच बदलले होते अगदी माणसांसकटघर प्रसन्न असले की माणसे पण आपोआप प्रसन्न दिसायला लागतातमाझ्या डोक्यात उगीच "हर घर कुछ केहता हैं " ची जाहिरात येवून गेलीमी काही बोलणार तेवढ्यात उन्मेष समोर आलाआम्ही दोघेही एकमेकांकडे बघत होतोदोघांच्या डोळ्यात पाणी होतेउन्मेष झरकन वळालावहिनींना म्हणाला आम्हाला बोलायचे आहे कोणीही त्रास देवू नकाकितीही वेळ झाला तरीही
मी आणि उन्मेष त्याच्या खोलीत बसलो होतोघरचे रूपच पालटले होते आणि उन्मेशाचेहीखूप बोलायचे होते पण सुरवात कोणी आणि कुठून करायची हे काही कळत नव्हतेमी sorry म्हणून बोलायची सुरुवात करयचा विचार करत होतो तेव्हढ्यात तो म्हणाला "तू sorry म्हणूच नकोस, तू काय विचार करतोस आणि मला का भेटला नाहीस ते मला माहित आहे. झाले ते चांगले झाले, तू आला असतास तर मी आणलेले धीराचे उसने अवसान लगेच गाळले असते. तू जर मला भेटायला आला नाहीस तरी त्या अवघड वेळी तू काय आणि किती मदत केली आहे ते मला माहिती आहे. मला माहित होते तुला एक दिवस राहवणार नाही आणि तू मला भेटायला येशीलच. साल्या तू किती "senti" आहेस ते मला माहित आहे."  मी काही बोलणार तेव्हां तो म्हणाला "आज तू काहीच बोलू नकोस.  तुला माहित नाहीये इतके दिवस मनात काय काय साठलंय ते" मी फक्त मान डोलावली आणि उन्मेष परत बोलायला लागला "आज सहा महिने होतील अपघात होवून. त्या अपघातात डोळ्यांना काहीतरी इजा झाली आणि नजर गेली. मी शुद्धीवर आल्यावर मला समजले आणि त्या अंधारातून अनेक प्रश्न समोर आले.  आज पर्यंत जसा वागत आलो आणि त्यातून मी काय काय गमावले, मला आता काय काय दिसणार नाही याची यादीच त्या अंधारात माझ्यासमोर नाचत होती. मनातून खचत चाललो होतो अगदी आत्महत्येचा विचारहि केला. पण अचानक नेत्रदान करणाऱ्या कोणीतरी हा सगळा अंधार दूर केला. डॉक्टरांनी मला सांगितले कि त्या व्यक्तीला तिचे नाव गुप्त ठेवायचे आहे आणि डोळे उघडल्यावर तुम्ही पहिल्यांदा सूर्योदय बघावा अशी त्या व्यक्तीची विनंती आहे. मी होकार कळवला. सूर्योदय बघितला पण असा सूर्योदय आधी का दिसला नव्हता याचे उत्तर काही सापडेना. डॉक्टरांनी एक पत्र आणून दिले. त्या पत्रात लिहिले होते, "या डोळ्यांनी आयुष्यभर फक्त उन्हच बघितले आहे. कायम माणसातले चूक तेव्हढेच बघितले पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे विसरलो. दुर्योधन आणि उधीष्ठीर यांची गोष्ट लक्षात ठेवा. बघा जमतंय काजग चांगले आहे आणि वाईटही आहेकारण दृष्टी तशी सृष्टी… " हे सगळे वाचले आणि डोळे खाडकन उघडलेविचार केला आणि लक्षात आले की आपण चुकतोयहे आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने जगता येवू शकते. पाडगावकर आठवले रेबस मग काय…?  नव्याने सुरु केले जगायलाखरंच सांगतो मित्र खूप बरं वाटते आता… " तो असाच काय काय बराच वेळ सांगत होता
मी घरी पोहोचलो आणि मला सगळ्यांनी घेरला. मी शांत होतो. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती माझ्याकडे पण मी शांत होतो. पाणी घेईपर्यंत सगळे शांत बसले आणि पुन्हा प्रश्नांचा भडीमारशेवटी सगळे शांत झाल्यावर मी फक्त एव्हढेच म्हणालो

"नजर लागलीये साल्याला"






परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...