बुधवार, ३१ मार्च, २०१०

वरातीमागून घोडे

नमस्कार,

परवाच पुण्यनगरीतील "मराठी साहित्य संमेलन" अगदी थाटात पार पडले. उद्घाटनापासून ते सामारोपापर्यंत या संमेलनाची दोन वैशिष्ठ सांगता येतील.
संमेलनास मिळालेला अबल-वृद्धांचा आणि समाजाच्या सर्व थरातून मिळालेला सक्रीय सहभाग....
आणि सुरवातीपासून शेवट पर्यंत या न त्या कारणामुळे घडलेले वाद विवाद...
संमेलनाच्या आदल्या दिवशीच गुटका तयार करणाऱ्या माणिकचंद कंपनीच्या प्रयोजाकात्वावरून गदारोळ झाला. या सर्व प्रकारात संमेलन अधाक्षांचे मत आणि स्वागत समितीच्या अधाक्षांची मते एकमेकांच्या विरोधी होती. एक जण संमेलनाला येताना वारकरी ज्या भावनेने पंढरीची वारी करतो त्या भावनेने यावे अशी भूमिका मांडत असताना दुसरा मात्र सर्व मान्यवरांना अलिशान गाडी व अलिशान (पंचतारांकित) राहण्याची सोय वगेरे विचार मांडत होता. बहुदा हे आणि अजून वाद उघड होवू नयेत आणि आपले हसे होवू नये म्हणून श्री माणिकचंद यांनी प्रायोजकत्व मागे घेत असल्याची घोषणा केली...आणि शेवटी या वादावर पडदा पडला....
संमेलनचे उद्घाटन विंदा करंदीकरांच्या हातून होणार होते पण त्याधीच विंदा आपल्याला पोरके करून गेले.....हा विचार अजून मनात ताजा असतानाच विंदांच्या काव्य-वाचनाचे ध्वनी-चित्रमुद्रण दाखवून विंदांना आदरांजली वाहिली गेली... मग नंतरचे तीन दिवस पुणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले रसिक साहित्य रसात मनसोक्त डुंबत होते... तृप्त होत होते.... मग ते द.म. मिरासदारांचे कथाकथन असेल किंवा मंगेश पाडगावकरांचे किंवा निमंत्रित कवींचे काव्य-वाचन असेल सगळ्यांनीच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली होती...
रसिक या सर्वच कार्यक्रमाचा आनंद घेत असतानाच अचानक मुखमंत्री अशोक चव्हाण येणार असल्याची (ते पण १ दिवस आधीच, बहुधा कार्यक्रमातील बदल दिल्लीवरून सुचवला गेला असावा) बातमी आली.. आयोजकांची पळापळ झाली खरी पण पण त्यांनी योग्य प्रकारे सर्व निभावून नेले.. आणि नंतर समारोपाला श्री अमिताभ बच्चन हे उपस्थित होते. त्यांच्या भारदस्त आवाजातील काव्य वाचनाने कार्यक्रमात रंगत आणली.... आणि संमेलनाचे सूप वाजले...

खरे तर मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला हिंदीतून भाषण आणि कविता वाचन हे थोडे खटकले... अमिताभ हे एक नट म्हणून श्रेष्ठ आहेतच त्यात वाद नाही... त्यांना १ वेळ चित्रपटाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला बोलावणे समजू शकतो पण ज्या माणसाची एक साहित्यिक म्हणून कोणतीच ओळख नसताना समारोपाला बोलवणे निदान मला तरी खटकले... मरठी मातीवर.. महाराष्ट्रावर एव्हडी वाईट वेळ आली आहे का... की इथला एकही साहित्यिक "साहित्य संमेलनाचा" समारोप करण्यास योग्य आहे असे साहित्य संमेलन भरवणाऱ्या एकही व्यक्तीला वाटू नये.... या गोष्टींचे निकष तरी असे काय असतात.... इथे मराठी हृदय सम्राट म्हणून वावरणारे श्री.राज ठाकरे अथवा मराठी चा मुद्दा तुमचा की आमचा यावर भांडणार शिवसैनिक किंवा एकही मराठी साहित्यिक यापैकी कोणीच कसा आवाज उठवला नाही याचे आश्चर्य वाटत आहे...ही नक्की लाचारी आहे का कोणता खेळ तेच कळत नाही... हे सगळे आत्ता बोलून काही उपयोग नाही कारण जे व्हायचे ते घडून गेले आहे... जाहीरपणे हे सगळे बोलायचे म्हणजे नसते वाद ओढवून घ्या... पण हे मन काही शांत बसू देत नाही... म्हणून हा सगळा प्रकार..... आणि नाही म्हणायला आम्ही पण हे सगळे घडत असताना तुकाराम महाराजांच्या "तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे" याचे आचरण करत होतो...आत्ता वरातीमागून घोडे नेण्यात काही अर्थ नाही.......
--
चेतन कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...